सांगली, २९ जानेवारी – सांगली महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीकडून कचरावेचक महिलांना विनामूल्य चारचाकी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचसमवेत सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात महिला स्वच्छतागृहे बांधण्याचा आमचा मनोदय आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण सभापती सौ. गीतांजली ढोपे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सौ. गीतांजली ढोपे-पाटील पुढे म्हणाल्या, महापालिकेत महिला बालकल्याण समिती सभा पार पडली. यात महापालिका शाळांमधील मुलींसाठी कराटे प्रशिक्षण देणे, समुपदेशन केंद्र उभारणे, महिलांची रिक्त पदे भरणे, तक्रार निवारण कक्ष चालू करणे, शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारणे, महिला प्रशिक्षण आयोजित करणे, मनपा प्रसूतिगृहाची सुधारणा करणे यांसह अन्य निर्णय घेण्यात आले.