राममंदिर निर्माणासाठी पंकजा मुंडे यांनी दिला पाच लाख रुपये निधी 

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ५ लाख रुपयांचा निधी समर्पित करतांना

माजलगाव (जिल्हा बीड) – प्रभु श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ५ लाख रुपयांचा निधी समर्पित केला आहे. येथे एका कार्यक्रमात निधीचा धनादेश त्यांनी संबंधितांकडे सुपुर्द केला.

श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान जिल्ह्यात राबवण्यासाठी भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला परळी, आंबाजोगाई, केज, धारूर, माजलगांव या तालुक्यांचे भाजपचे अध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी अयोध्या येथील प्रभु श्रीराम यांच्या भव्यदिव्य मंदिराचे स्वप्न साकार होत आहे. मंदिर निर्माणाच्या कार्यात प्रत्येकाने योगदान देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.