|
नवी देहली – माझ्या पक्षातील काही सदस्यांचे असे मत होते की, वर्ष २००४ मध्ये जर मी पंतप्रधान असतो, तर वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला नसता; परंतु या मताशी मी सहमत नाही. मी राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर पक्ष नेतृत्वाने राजकीय दिशा गमावली. सोनिया गांधी पक्षातील प्रकरणे हाताळण्यास असमर्थ ठरत होत्या, तर डॉ. मनमोहन सिंह हे संसदेत मोठ्या प्रमाणात अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांचे खासदारांशी असलेले वैयक्तिक संबंध संपुष्टात आले, असा दावा दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या ‘द प्रेसिडेन्शिअल ईयर्स’ या पुढील मासात प्रकाशित होणार्या पुस्तकात केला आहे. मुखर्जी यांनी निधनापूर्वी हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकातील काही भाग सध्या समोर आला आहे. या पुस्तकात बंगालच्या एका गावात प्रणव मुखर्जी यांनी घालवलेल्या बालपणापासून ते राष्ट्रपतीपदापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करण्यात आले आहे.
In book, Pranab Mukherjee blames Sonia, Manmohan for 2014 rout; says Cong lost focus after he became President.https://t.co/7OQmaDeP0Y
— TIMES NOW (@TimesNow) December 12, 2020
या पुस्तकात मुखर्जी यांनी पुढे लिहिले आहे की, माझा असा विश्वास आहे की, शासन करण्याचा नैतिक अधिकार हा पंतप्रधानांवर आहे. देशातील संपूर्ण शासनव्यवस्था पंतप्रधान आणि त्यांच्या प्रशासनाच्या कामकाजातून दिसून येते.
पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी की किताब द प्रेसिडेंशियल इयर्स जनवरी में बाजार में आएगी।#PranavMukharji #ThePresidentialYearshttps://t.co/bkD5C9ojQK
— Asianetnews Hindi (@AsianetNewsHN) December 12, 2020
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना आघाडी वाचवण्याचा सल्ला देण्यात आला होता आणि तो शासनावर भारी पडत गेला.