गुजरातमध्ये कोरोनाच्या काळात २१ टक्के लोक कुपोषित ! – सर्वेक्षण

कोरोनाच्या आपत्काळात ही स्थिती आहे, तर पुढे येणार्‍या तिसर्‍या महायुद्धासारख्या आपत्काळात काय स्थिती असेल, याची कल्पना करता येईल ! अशा वेळी जिवंत रहाण्यासाठी जनतेला साधना करण्याला पर्याय नाही !

नवी देहली – ‘अन्न सुरक्षा अभियाना’च्या अंतर्गत गुजरातच्या ९ राज्यांत ‘आनंदी’ या संस्थेकडून ‘हंगर वॉच सर्वे’ करण्यात आला. यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या मासांमध्ये ८.९ टक्के लोकांना अनेकदा भोजन मिळाले नाही, तर कोरोनाकाळामुळे २०.१ टक्के लोकांना पुरेसे भोजन मिळाले नाही, तर २१.८ टक्के लोकांची चूलच पेटली नाही. दळणवळण बंदी उठल्यानंतर या स्थितीत विशेष पालट झालेला नाही.

या सर्वेक्षणामध्ये ६५ टक्के लोकांच्या उत्पन्नामध्ये घट झालेली, तर ४५ टक्के लोकांनी भोजनासाठी उधार पैसे घेतले, असे समोर आले. या काळात राज्य आणि केंद्र सरकारने शिधा वाटप केला; मात्र यामुळे विशेष परिणाम झाला नाही. (केंद्र आणि राज्य सरकार यांच्या साहाय्यानंतरही या स्थितीत पालट होत नसेल, तर सरकारी यंत्रणा काय कामाची ? – संपादक) या सर्वेक्षणानंतर या संस्थेने सरकारला काही शिफारसी केल्या आहेत.