युद्धासाठी भारत आता १० ऐवजी १५ दिवसांचा शस्त्रसाठा ठेवणार

चीन आणि पाक यांच्या कुरापतींच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय

नवी देहली – भारतीय सुरक्षादलाला आता लढाईसाठी लागणारा १५ दिवसांचा शस्त्रसाठा करून ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे. पूर्वी केवळ १० दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा सिद्ध ठेवण्याची सुरक्षादलांना अनुमती होती. चीनच्या सीमेवरील कुरापती लक्षात घेता भारताने हा निर्णय घेतला आहे. नव्या अधिकारांचा आणि आणीबाणीच्या काळातील खरेदीच्या अधिकारांचा वापर करून येत्या काही मासांमध्ये सैन्याकडून शस्त्रसाठ्यावर ५० सहस्र कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. स्वदेशी आणि परदेशी स्रोतांचा वापर करून विविध प्रकारचा सुसज्ज शस्त्रसाठा खरेदी केला जाणार आहे.