हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हिंदु संस्कृती सर्वांपर्यंत पोचवण्याचे कार्य अत्यंत तळमळीने करत आहेत ! – पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज

ही प्रभु रामकृष्ण यांची जन्मभूमी असल्याने संपूर्ण विश्‍वाला संस्कार आणि आदर्श मूल्ये देणारे हे राष्ट्र आहे. महाकुंभला दैवी कृपेचे वरदान आहे. गंगेच्या माध्यमातून दैवी कृपा होत आहे. धर्म हाच (धर्माचरण) या भूमीला (निसर्गाला) सुस्थितीत ठेवत असतो.

चारधामसह ५१ मोठी मंदिरे सरकारीकरणातून लवकरच मुक्त करणार !

तीरथसिंह रावत यांचा आदर्श घेऊन देशातील अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या राज्यांतील सहस्रो मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून भक्तांच्या कह्यात द्यावीत !

हिंदु राष्ट्र केवळ बळाच्या नव्हे, तर धर्माच्या आधारे स्थापन होणार ! – स्वामी अनंतानंद सरस्वती महाराज

या अभियानाच्या वेळी समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी स्वामी अभयनंद महाराज आणि त्यांचे शिष्य स्वामी अनंतानंद सरस्वती यांची भेट घेऊन त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.

हरिद्वार येथील सप्तसरोवर मार्गावर पेशवाईंचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने स्वागत !

या पेशवाईमध्ये श्रीआदिनाथ आखाड्याचे महामंडलेश्‍वर योगीक्षील महाराज, पिठाधिश्‍वर श्रीत्रिलोकीनाथजी महाराज (श्रीनाथ बाबाजी), अन्य महामंडलेश्‍वर, महंत आणि भक्तगण सहभागी होते.

हिंदु जनजागृती समितीचे कार्य अत्यंत प्रशंसनीय ! – श्री स्वामी बालकानंदजी महाराज

या प्रसंगी श्री स्वामी बालकानंदजी महाराज यांनी समितीच्या वतीने कुंभमेळ्यात लावण्यात आलेल्या धर्मजागृती प्रदर्शनाला आवर्जून भेट देणार असल्याचे सांगितले.

संस्कृती रक्षणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी व्हा ! – १००८ अनंत विभूषित श्री महामंडलेश्‍वर उमाकांतानंद सरस्वती महाराज

या वेळी १००८ अनंत विभूषित श्री महामंडलेश्‍वर उमाकांतानंद सरस्वती महाराज यांनी हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील ‘पाना’ला आपण ‘फॉलो’ करत असल्याचे आवर्जून सांगितले.

कुंभमेळ्यामध्ये बैरागी आखाड्यांच्या धर्मध्वजाची स्थापना

निर्वाणी, निर्मोही अनी, दिगंबर या तीनही बैरागी आखाड्यांच्या धर्मध्वजाची स्थापना झाल्याचे आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरि महाराज यांनी घोषित केले.

निवडणुका असणार्‍या राज्यांत नाही, तर महाकुंभला कोरोनाचा धोका कसा ? – शंकराचार्य जगद्गुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती

बंगाल आणि आसाम राज्यांत निवडणुका आहेत; मात्र तेथे संक्रमणाचा कोणताही धोका नाही; मात्र सनातन धर्माच्या सर्वांत मोठे पर्व महाकुंभ मेळ्याला कोरोनाची भीती दाखवून भाविकांना येण्यापासून रोखले जात आहे.

कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून ७०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त ! – तीरथसिंह रावत, मुख्यमंत्री, उत्तराखंड

कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून ७०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी ‘ऑनलाईन’ पत्रकार परिषदेमध्ये दिली.

कुंभमेळ्यातील आखाड्यांना पायाभूत सुविधा न मिळाल्याने साधूसंतांचा संताप अनावर : अप्पर मेळा अधिकार्‍याला धक्काबुक्की

हिंदूंच्या सर्वांत मोठ्या कुंभमेळ्याला किमान पायाभूत सुविधाही उपलब्ध करू न शकणार्‍या अकार्यक्षम प्रशासकीय अधिकार्‍यांवर भाजपशासित सरकारने कडक कारवाई करावी, हीच धर्मप्रेमी हिंदूंची अपेक्षा !