राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी साधूसंतांनी कृतीशील होणे, ही काळाची आवश्यकता ! – स्वामी सुरेश महाराज

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

स्वामी सुरेश महाराज यांना कुंभमहिमा विशेषांक भेट देतांना श्री. हरिकृष्ण शर्मा

हरिद्वार, १३ एप्रिल (वार्ता.) – प्रत्येक साधूसंतांनी राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी कृतीशील होणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी संतांनी पुढे आले पाहिजे. असे झाले, तरच संतांवरील आघात (आक्रमणे) अल्प होतील, असे प्रतिपादन येथील श्री पंचायती नया उदासीन निर्वाण आणि सीताराम आश्रमाचे स्वामी सुरेश महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.  या वेळी स्वामी सुरेश महाराज यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. या कार्याची समाजाला आवश्यकता आहे’, असे म्हणाले. या प्रसंगी महाराजांना ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. हरिकृष्ण शर्मा हेही उपस्थित होते.

स्वामी सुरेश महाराज यांचा परिचय

स्वामी सुरेश महाराज हे पंजाबमध्ये गोरक्षण, संस्कृती रक्षण आणि धर्मांतर यांविषयी भक्तांमध्ये जनजागृती करतात.