
हरिद्वार, ११ एप्रिल (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीसह सनातन संस्थेने ‘धर्म आणि राष्ट्र’विषयक चित्रमय प्रदर्शनाद्वारे धर्माविषयीचे बारकावे सांगितले आहेत. राष्ट्र आणि धर्म यांविषयी समाजामध्ये जागृती करण्याचे या संघटनांचे हे कार्य कौतुकास्पद आहे, असे कौतुकोद्गार छत्तीसगड (रायपूर) येथील शदाणी दरबार तीर्थचे नववे पिठाधीश पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज यांनी काढले. येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’ला भेट दिल्यावर पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज यांनी वरील कौतुकोद्गार काढले. या वेळी स्वामी परमात्मानंद गिरि महाराज यांच्यासह शदाणी दरबार तीर्थचे अनेक भक्त उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी या संतद्वयींचा पुष्पहार घालून सन्मान केला.
पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज यांचा परिचय
छत्तीसगड (रायपूर) येथील शदाणी दरबार तीर्थचे नववे पिठाधिश पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज हे विश्व हिंदु परिषदेच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आणि विश्व हिंदु परिषदेच्या उच्च अधिकार समितीचे सदस्य आहेत.
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त