श्री उदासीन कार्ष्णि आश्रमाचे श्री गुरु शरणानंद यांची हिंदु जनजागृती समितीकडून घेण्यात आली भेट !

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

श्री गुरु शरणानंद यांना माहिती देतांना श्री. सुनील घनवट

हरिद्वार, १३ एप्रिल (वार्ता.) – येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीकडून चालवण्यात येत असलेल्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ अंतर्गत श्री उदासीन कार्ष्णि आश्रमाचे श्री गुरु शरणानंद यांची भेट घेण्यात आली. समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट अन् धर्मप्रेमी श्री. संजय पुंडिर यांनी त्यांची भेट घेतली. श्री. घनवट यांनी त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती देऊन येथे लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रण दिले. या वेळी श्री गुरु शरणानंद यांनी ‘वेळ काढून भेट देऊ’, असे सांगितले.

या वेळी आश्रमाचे महामंडलेश्‍वर गीता मनीषी स्वामी श्री ज्ञानानंद महाराज यांचीही भेट घेण्यात आली. वर्ष २०१९ मध्ये समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली होती. ‘याही वेळी वेळ काढून केंद्राला भेट देऊ’, असे त्यांनी सांगितले.