ज्वालापूर विधानसभा (हरिद्वार) येथील भाजप आमदार आणि महामंडलेश्वर रविदासाचार्य श्री. सुरेश राठौर यांची सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्राला भेट

हरिद्वार, १३ एप्रिल (वार्ता.) – या नगरीत तुम्ही लावलेले केंद्र धर्माविषयी ज्ञानाचे स्रोत आहे. हिंदु संस्कृती विज्ञानावर आधारित आहे. तुम्ही प्रदर्शनाच्या स्वरूपात लावलेले हे केंद्र अत्यंत सुंदर आहे. तुमच्या कार्यामुळे सनातन धर्माला बळकटी मिळत आहे. तुम्ही विज्ञानाच्या आधारावर धर्म प्रमाणित करण्याचा प्रयत्न करत आहात. तपोभूमी हरिद्वारमध्ये तुम्ही हे कार्य करत आहात, त्याविषयी तुम्हाला धन्यवाद देतो, असे कौतुकोद्गार येथील ज्वालापूर विधानसभेचे भाजप आमदार आणि महामंडलेश्वर रविदासाचार्य श्री. सुरेश राठौर यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभमेळ्यामध्ये लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला श्री. सुरेश राठौर यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी श्री. सुरेश राठौर यांना केंद्रातील धर्म आणि राष्ट्र विषयक ग्रंथ, फलक प्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादनांची माहिती दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा सत्कार केला.
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त