हिंदु जनजागृती समितीचे हिंदु धर्म आणि संस्कृती रक्षणाचे कार्य प्रेरणादायी ! – श्री १००८ श्री कमलानंद गिरि

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

श्री १००८ श्री कमलानंद गिरि (मध्यभागी) यांना कुंभमहिमा विशेषांक भेट देतांना उजवीकडे श्री. सुनील घनवट आणि धर्मप्रेमी श्री. संजय पुंडिर

हरिद्वार, १३ एप्रिल (वार्ता.) – अन्य पंथियांकडून हिंदूंवर अन्याय होत आहे. याचा विरोध होणे आवश्यक आहे. पंजाबमध्ये होणारे धर्मांतर ही चिंतेची गोष्ट आहे. तुमच्या माध्यमातून होणारे हिंदु धर्मप्रसाराचे कार्य कौतुकास्पद आहे, तसेच तुम्ही करत असलेले हिंदु धर्म आणि संस्कृती रक्षणाचे कार्य प्रेरणादायी आहे. तुम्ही किती तळमळीने हे कार्य करत आहात, हे दिसत आहे. तुमच्या प्रबोधन केंद्राला अवश्य भेट देऊ, असे प्रतिपादन येथील श्री कल्याण कमल आश्रमाचे श्री १००८ श्री कमलानंद गिरि यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, श्री. हरिकृष्ण शर्मा आणि धर्मप्रेमी श्री. संजय पुंडिर यांनी ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’च्या अंतर्गत त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. श्री १००८ श्री कमलानंद गिरि यांना कुंभमेळ्यामध्ये लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले.