हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सुप्रसिद्ध कथाकार पू. रमेशभाई ओझा यांची घेण्यात आली सदिच्छा भेट !

पू. रमेशभाई ओझा

हरिद्वार, १४ एप्रिल (वार्ता.) – येथील सुप्रसिद्ध कथाकार पू. रमेशभाई ओझा यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली, तसेच कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रणही दिले. या वेळी पू. रमेशभाई ओझा यांनी ‘प्रदर्शन पहायला येण्यासाठी प्रयत्न करतो’, असे सांगितले. या प्रसंगी धर्मप्रेमी श्री. संजीव पुंडिर, समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया उपस्थित होते.