शरजील उस्मानी याच्या विरोधात गुन्हा नोंद

शरजील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तो सध्या महाराष्ट्रात नाही. त्याला पकडण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

देहलीऐवजी चीनच्या सीमेवर खिळे ठोकले असते, तर चीनने घुसखोरी केली नसती ! – संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

महाविकास आघाडीचे सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्‍वास आम्ही शेतकरी नेते राकेश टिकैत यांना देऊ. त्यांच्या लढ्याला बळ देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.

‘एल्गार परिषदे’चे आयोजक आणि वक्ते यांच्यावर दखलपात्र गुन्हा नोंद करा ! – अजय सिंह सेंगर, अध्यक्ष, महाराष्ट्र करणी सेना

शरजील उस्मानी यांनी भाषण करतांना ‘हिंदु धर्म सडका आहे’, असे उद्गार काढले आहेत. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.

कर्नाटकचा राजकीय दहशतवाद संपवावाच लागेल ! – शिवसेना

बेळगावसह सीमा भागातून मराठी भाषा, संस्कृतीच्या खुणा उखडून टाकण्याचा चंग कानडी सरकारने बांधला आहे. हा राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद आहे. तो संपवावाच लागेल, अशी भूमिका शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून मांडली आहे.

लोकांना प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मण सवदी यांचे वक्तव्य ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

(म्हणे), ‘मुंबई कर्नाटकची असून त्यावर आमचा अधिकार आहे !’ – लक्ष्मण सवदी, उपमुख्यमंत्री, कर्नाटक

कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जोपर्यंत हे प्रकरण न्यायालयात आहे, तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित का केला जाऊ नये ? जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत आपल्या सरकारने हा भूभाग केंद्रशासित करण्याची मागणी न्यायालयात केली पाहिजे.

सर्वांसाठी लवकरच लोकल सेवा चालू करू – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत लोकल सेवा चालू करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

आता डोळ्यांना न दिसणार्‍या शत्रूसमवेत आपले युद्ध चालू झाले आहे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आपल्याच साधनांचा वापर करून गुन्हे करणारी टोळी कार्यरत आहे. जगात कुठेही बसून घरातील माहिती, पैसे आणि अन्य गोष्टींची चोरी या माध्यमातून चालू आहे. असे असले, तरी गुन्हेगारी विश्वात धाक बसवणारे मुंबई हे देशातील पहिले शहर असेल !

भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा नोंद करून ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्यावा ! – मुख्यमंत्र्याना निवेदन

लेखक भालचंद्र नेमाडे यांनी या पुस्तकात हिंदु धर्मासमवेत जिल्ह्यातील १२ कोटी बंजारा समाज बांधवांच्या धर्मभावना दुखावल्या आहेत. त्या समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह लिखाण केले.

मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर धारिकेमधील माहितीत पालट करून चौकशीचा आदेश रहित करण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चौकशी आदेशाच्या धारिका गुप्त असतात. असे असतांनाही हा प्रकार घडणे धक्कादायक आहे.