बंदुकीची गोळी लागून युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी

युवराज दीपक वारंग (वय १८ वर्षे) या युवकाचा २६ नोव्हेंबरला छातीत बंदुकीची गोळी (छरा) घुसून मृत्यू झाला होता. या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी ४  संशयितांना अटक केली अन् त्यांच्याकडून २ बंदूका कह्यात घेतल्या.

तम्नार वीज प्रकल्पाला मोले ग्रामपंचायतीने दिलेली बांधकाम अनुज्ञप्ती न्यायालयाकडून रहित

सांगोड येथे उभारण्यात येणार्‍या तम्नार वीजप्रकल्पाला मोले पंचायतीने दिलेली बांधकाम अनुज्ञप्ती उच्च न्यायालयाने रहित केली आहे.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत गोहत्याबंदी आणि लव्ह जिहादविरोधी विधेयक यांची मागणी !

गोहत्या बंदी विधेयक आणि लव्ह जिहादविरोधी विधेयक लवकरात लवकरात विधीमंडळात मांडावे, अशी मागणी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत ६ डिसेंबर या दिवशी करण्यात आली.

धर्मादाय कार्यालयातील सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ! – आयुक्त

कोरोनामुळे धर्मादाय आयुक्तालयातील अनिर्णित प्रकरणांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी राज्यातील धर्मादाय कार्यालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज चालू करण्याविषयी धर्मादाय आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या सहा आंदोलकांवर गुन्हा नोंद

कृषी आणि कामगार कायदे मागे घेण्यासाठी देहलीमध्ये चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील छत्रपती संभाजी चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन केले. आंदोलकांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला .

वास्को येथे अनधिकृत भूमीत मदरसा उभारण्यास हिंदु संघटनांचा विरोध

भूमीच्या मालकाने संबंधित ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे धार्मिक स्थळ उभारले जाणार नसल्याची हमी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दिली.

आयुर्वेदीय उपाय आणि पारंपरिक ज्ञान प्रमाणित होत नाही, तोपर्यंत वापरायचेच नाही का ? – डॉ. संजय देशमुख, माजी कुलगुरु, मुंबई विद्यापीठ

आंतरिक क्षमतेला प्राधान्य देऊन शिकता आले पाहिजे. त्यादृष्टीने नवे शैक्षणिक धोरण लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी येथे केले.

गोव्यातील राष्ट्रीय हमरस्ता प्रकल्प जून २०२१ पर्यंत पूर्ण होणार

गोव्यातील सर्व राष्ट्रीय हमरस्ता प्रकल्प जून २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ता वाहतूक आणि हमरस्ता खात्याचे  पदाधिकारी पांडे यांनी चालू असलेल्या कामांची पहाणी केल्यानंतर दिली.

ब्राह्मण महासंघाचा तृप्ती देसाई यांना विरोध

तृप्ती देसाई यांना विरोध करत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद दवे यांनी सहकार्‍यांसह शिर्डी येथे लावलेल्या फलकाचे पूजन केले आणि संस्थानच्या भूमिकेला पाठिंबा दिला. १० डिसेंबरला तृप्ती देसाई  आल्यास त्याला विरोध करू, अशी चेतावणी महासंघाने दिली आहे.

‘शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती’, हे विसरू नका ! – बसनगौडा पाटील, आमदार, विजापूर

मराठा विकास महामंडळाला केलेल्या विरोधाचे प्रकरण