पुणे – कोरोनामुळे धर्मादाय आयुक्तालयातील कामकाजावर विपरीत परिणाम झाला असून अनिर्णित प्रकरणांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्याचा कारभार सांभाळण्यासाठी असणारा अपुरा कर्मचारीवर्ग आणि प्रलंबित कामांची यादी यांमुळे पक्षकार आणि अधिवक्ते यांचा वावर कार्यालयात वाढला आहे. परिणामी कोरोना प्रतिबंधक नियमाचे काटेकोर पालन होणे कठीण जाणार असल्याने राज्यातील धर्मादाय कार्यालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज चालू करण्याविषयी धर्मादाय आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे. यामुळे कामकाज करणे सुलभ होईल आणि वेळेची बचत होऊन निर्णयप्रक्रिया लवकर होतील, असे म्हटले आहे.