श्रीरामपूर (नगर) – कृषी आणि कामगार कायदे मागे घेण्यासाठी देहलीमध्ये चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील छत्रपती संभाजी चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी कामगार संघटनेच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन दिले. कामगार नेते नागेश सामंत यांच्या नेतृत्वाखाली एम्.आय.डी.सी. कामगार, हमाल- माथाडी कामगार, महाबीज कामगार, सिमेंट कामगार संघटना, पेठ हमाल माथाडी कामगार, शेत कामगार, हातगाडी कामगार आणि रिक्शा कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. आंदोलकांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन केले. नागेश सामंत यांच्यासह ६ आंदोलकांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणार्या सहा आंदोलकांवर गुन्हा नोंद
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणार्या सहा आंदोलकांवर गुन्हा नोंद
नूतन लेख
- दगडूशेठ गणपतीसमोर ३५ सहस्र महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती !
- धर्मासाठी हिंदूंनी एकत्र येण्याची आवश्यकता ! – कालीचरण महाराज
- राज्यभरात दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन
- भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे बनावट नोटाप्रकरणी मुसलमानांना अटक !
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आळंदी येथे संजीवन समाधीचे दर्शन !
- प्रथम इतिहास पक्का करण्याची आवश्यकता ! – भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार