संस्कृतला राष्ट्रभाषा करा !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘देशाची राष्ट्रभाषा ही संस्कृत असायला हवी’, असा प्रस्ताव दिला होता; कारण उत्तर भारतात तमिळला, तर दक्षिण भारतात हिंदीला विरोध होऊ शकतो, हे त्यांना ठाऊक होते, असे प्रतिपादन सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केले.

डिचोली नगरपालिकेचे नूतन नगरसेवक श्री. विजयकुमार नाटेकर यांनी घेतली संस्कृत भाषेतून शपथ !

सनातन परिवाराच्या वतीने श्री. विजयकुमार नाटेकर यांचे अभिनंदन !

आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचा भाषाभिमान !

एकदा ‘इंग्रजी न येणे, हे माझे दुर्दैव नाही; पण संस्कृतसारखी देवभाषा न येणे, हे तुमचे दुर्दैव नक्कीच म्हटले पाहिजे’, अशा शब्दांत त्यांनी एका पाश्‍चात्त्य विचारांचा प्रभाव असलेल्या भारतीय विद्वानाला गप्प केले होते.

अखिल भारतीय ‘भाषा पर्व स्पर्धे’मध्ये सनातनची बालसाधिका कु. वेदिका मोदी हिच्या संस्कृत कथाकथनाला प्रथम क्रमांक

कु. वेदिका मोदी हिने संस्कृत विभागातील ‘संस्कृत कथाकथन’ या प्रकारामध्ये येथील ‘देहली पब्लिक स्कूल’चे प्रतिनिधीत्व केले.

भाषांतर म्हणजे धर्मांतर आणि पुढे राष्ट्रांतर !

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे समर्पक म्हणणे होते. आज ते असते, तर भाषांतर म्हणजे धर्मांतर आणि पुढे राष्ट्रांतर असे मत त्यांनी खचित्च व्यक्त केले असते.

संस्कृतला महत्त्व दिले जात नसल्याने मी संस्कृत भाषेत चित्रपटनिर्मिती केली ! – दिग्दर्शक वीजेश मणी

संस्कृत ही समृद्ध भाषा असूनही तिला महत्त्व दिले जात नाही; म्हणून मला संस्कृत भाषेतील चित्रपटाची निर्मिती करायची होती, असे उद्गार नमो या श्रीकृष्ण आणि सुदामा या कथेवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. वीजेश मणी यांनी काढले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘युगानुयुगे संस्कृत व्याकरण तेच आहे. त्याच्यात कुणीच काहीच पालट केलेला नाही. याचे कारण ते पहिल्यापासून परिपूर्ण आहे. याउलट जगातील सर्वच भाषांतील व्याकरण पालटत असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले        

संस्कृतला राष्ट्रीय भाषा घोषित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते ? काँग्रेसने संस्कृतला मृत ठरवले, त्या भाषेला आताच्या सरकारने पुनरुज्जीवित करून त्याला गतवैभव मिळवून देणे संस्कृतप्रेमींना अपेक्षित आहे !

गोव्यात संस्कृतभारतीकडून शालेय मुलांना घरबसल्या संस्कृत शिकण्यासाठी उपक्रम

शालेय मुलांसाठी घरबसल्या संस्कृत शिकण्याची सुलभ आणि उपयुक्त अशी संधी गोव्यात ‘संस्कृतभारती’कडून देववाणी परीक्षा योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी कौस्तुभ कारखानीस, प्रकल्प संचालक, देववाणी संस्कृतभारती, ९८२३९४५०९४ यावर संपर्क साधावा, असे कळवण्यात आलेे आहे.

संस्कृत हीच संस्कृती !

इंग्रजी बोलणार्‍यांच्या देशात कार्यक्रमांचा प्रारंभ संस्कृत भाषेतून होत आहे आणि ती पाश्‍चात्त्य भाषांना वरचढ ठरत आहे. ‘भाषा मरता, देश आणि संस्कृतीही मरते, तर भाषा जगता देश आणि संस्कृती यांना ऊर्जितावस्था येते’, असे म्हटले जाते. जगभरात संस्कृतचे केले जाणारे गुणगान ही आगामी हिंदु राष्ट्राची नांदीच ठरणार आहे, यात शंकाच नाही.