आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचा भाषाभिमान !

आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती

भारतातील विद्वान संत आणि आधुनिक काळातील समाज सुधारक यांच्यामध्ये आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचे नाव सन्मानाने घेतले जाते. एकदा ‘इंग्रजी न येणे, हे माझे दुर्दैव नाही; पण संस्कृतसारखी देवभाषा न येणे, हे तुमचे दुर्दैव नक्कीच म्हटले पाहिजे’, अशा शब्दांत त्यांनी एका पाश्‍चात्त्य विचारांचा प्रभाव असलेल्या भारतीय विद्वानाला गप्प केले होते.

वर्ष १८७३ ची घटना आहेे. त्या वेळी स्वामी दयानंद सरस्वती बंगालमध्ये गेले होते. तेथे त्यांनी भारतीय संस्कृतीच्या पुन:जागृतीशी संबंधित अनेक विद्वानांच्या भेटी घेतल्या. या चर्चांमध्ये अनेक महापंडितांशी त्यांचे कठोेर शास्त्रार्थ झाले. धर्मातील रुढींवर त्यांनी कठोर टीका केली. ब्राह्म समाजाचे संस्थापक केशवचंद्र सेन भारतीय संस्कृतीचे गहन अभ्यासक होते. ते मुलांना देण्यात येत असलेल्या शिक्षणाविषयी स्वामी दयानंद सरस्वती यांच्याहून वेगळे मत ठेवत होते. वास्तविक केशवचंद्र सेन पाश्‍चात्त्य विचारांनी प्रभावित होते. त्यांना ‘शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे’, असे वाटत होते. याउलट स्वामी दयानंद सरस्वती शिक्षणासाठी संस्कृतला प्राधान्य देत होते.

या विषयावरील चर्चेच्या वेळी एकदा केशवचंद्र स्वामीजींना म्हणाले, ‘‘मला याचे वाईट वाटते की, आपल्यासारख्या महान विद्ववेत्त्याला इंग्रजी भाषा येत नाही. जर तुम्हाला इंग्रजी आली असती, तर मी तुम्हाला इंग्लंडला घेऊन गेलो असतो.’’ यावर स्वामी दयानंद सरस्वती थोडे हसले आणि म्हणाले, ‘‘मीही ब्राह्म समाजाच्या नेत्याला संस्कृत येत नसल्याविषयी दु:ख व्यक्त करतो. मला दु:ख आहे की, त्यांना सनातनसारख्या सभ्य धर्मीय भारतियांना इंग्रजी भाषेत शिकवायचे आहे, जिला बहुतांश भारतीय समजूही शकत नाहीत.’’ या कठोर टिपणीवरून सेन समजले आणि भाषेवरील प्रश्‍नाला कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत.’’

(साभार : ‘भारतीय पुन:जागरण और आर्य समाज’ पुस्तकातून)