सनातन परिवाराच्या वतीने श्री. विजयकुमार नाटेकर यांचे अभिनंदन !

डिचोली – येथे नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून निवडून आलेले नगरसेवक श्री. विजयकुमार परशुराम नाटेकर यांनी पालिका मंडळाच्या शपथग्रहण सोहळ्यात स्वतःहून संस्कृत भाषेत शपथ घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मराठी भाषेत शपथपत्र मिळाल्यावर त्वरित त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून माशेल येथील संस्कृत शिक्षक श्री. राजेश ठक्कर यांना संपर्क केला. श्री. ठक्कर यांनी संस्कृत भाषेत शपथपत्र बनवून दिले. त्यानंतर श्री. विजयकुमार नाटेकर यांनी संस्कृतमध्ये शपथपत्र वाचण्याचा सरावही केला. श्री. नाटेकर यांचा प्रभाग क्रमांक १ असल्याने त्यांचा शपथविधी सर्वांत आधी झाला. पहिलेच शपथग्रहण संस्कृतमध्ये झाल्याने नगरपालिका भवनातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. श्री. नाटेकर यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
साधकांना सूचना : सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण