उत्तरप्रदेशमधील पंचायत निवडणुकीत समाजवादी पक्षाची सरशी
विशेष म्हणजे अयोध्या, काशी आणि मथुरा या जिल्ह्यांतही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.
विशेष म्हणजे अयोध्या, काशी आणि मथुरा या जिल्ह्यांतही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.
सचिन वाझे याला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यास माझा विरोध होता. त्यासाठी मी शरद पवार, संजय राऊत आणि अनिल देशमुख यांना सांगितले होते; पण माझे ऐकले गेले नाही. सरकारने ही मोठी चूक केली असे वक्तव्य अबू आझमी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.
स्वातंत्र्यपूर्व आणि नंतर देशद्रोह करणार्यांचीही नावे हटवून हुतात्मा चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल आदी देशभक्तांची नावे ठेवण्यात यावीत.
ज्या बाबराने अनेक हिंदूंची हत्या केली, तसेच अयोध्येतील श्रीराममंदिर पाडून तेथे बाबरी मशीद बांधली, त्या बाबराचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करायला हवे, असे अबू आझमी यांना वाटते का ?
शेतकरी आंदोलनातील भाषणांचा गोशवारा पहाता हा मोर्चा शेतकर्यांच्या हितासाठी होता कि केंद्र सरकार पाडण्यासाठी होता ?, आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांपैकी किती जण शेतकरी आणि किती जण साम्यवादी आहेत, याचाही शोध घ्यावा लागेल !
शिळ्या कढीला उकळी देण्याचा काँग्रेसचा नेहमीचा प्रयत्न ! काँग्रेसवाल्यांना सावरकर आजन्मात कळणार नाहीत आणि ते अशा प्रकारची हास्यास्पद मागणी करत रहातील !
नरोत्तम मिश्रा यांनी हिंदु धर्माला कुणीही, कुठल्याही प्रकारे आणि कधीही लक्ष्य करू नये; म्हणून कठोर कायदा करण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या केंद्रातील सरकारला सांगावे आणि हिंदु धर्माचे रक्षण करावे, असे हिंदूंना वाटते !
असा दावा करून हसन दगडफेक करणार्या धर्मांधांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही !
अशांची पदावनती न करता त्यांना थेट बडफर्तच केले पाहिजे; कारण अशा मानसिकतेच्या व्यक्ती खालच्या पदावर नियुक्त झाल्या, तरी पुन्हा भ्रष्टाचार करणार नाहीत, याची शाश्वती देता येणार नाही !
जनहिताऐवजी स्वहिताकडे लक्ष देणारे असे राजकारणी भारताच्या भवितव्यासाठी घातक आहेत. सतत स्वहिताचाच विचार करणारे असे राजकारणी समाजाचा उत्कर्ष करू शकत नाहीत. त्यामुळे अशांना घरी बसवण्यासाठी आता जनतेनेच पावले उचलणे आवश्यक !