
पुणे – अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ते १२ जुलै या कालावधीत ही विशेष पडताळणी मोहीम पुणे जिल्ह्यातील विविध विभागांत राबवण्यात आली. अन्न व औष़ध प्रशासनाने ७ ठिकाणी धाड घालत ९२ सहस्र ५४१ किलो अन्नसाठा त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून कह्यात घेण्यात आला. पुणे जिल्ह्यातील ‘अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीज’ आणि ‘प्रियदर्शनी दूध संकलन केंद्रा’च्या टँकरमधील ५३ सहस्र लिटर दूध नष्ट करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील ‘अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीज’च्या ‘चिलिंग सेंटर’वरही विनापरवाना व्यवसाय आणि नियमांचे उल्लघंन केल्याने ३७ सहस्र ५३२ लिटर दूध नष्ट केले. जुन्नर येथील ‘यशोदा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस्’ संस्थेतील १ सहस्र ८०६ लिटर दूध कह्यात घेऊन संस्थेला व्यवसाय बंदची सूचना (नोटीस) देण्यात आली.
सांगली जिल्ह्यातील ‘मालती एजन्सी’मधून पनीर, लस्सी, तर कोल्हापूर जिल्ह्यातील बालाजी बेकर्समधून विविध प्रकारच्या कुकीजचे नमुने घेऊन साठा कह्यात घेण्यात आला. सातारा जिल्ह्यातील फलटण येथे दुधात भेसळीसाठी पावडर वापरली जात असल्याचे निदर्शनास आल्याने ५ जणांविरोधात फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)