ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत

  • ७ गुन्ह्यांची उकल

  • पूर्वीचे ५३ गुन्हे नोंद !

ठाणे, १६ जुलै (वार्ता.) – ठाणे, भिवंडी, बदलापूर, वर्तकनगरसह विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या करून पोलिसांसमोर आव्हान उभे करणार्‍या युसूफ रशीद शेख उपाख्य दीपक (वय ४२ वर्षे) आणि नौशाद मुस्ताक आलम उपाख्य सागर (वय ३२ वर्षे) या २ सराईत गुन्हेगारांना भिवंडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत घरफोडीचे ७ गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून १७ लाख २७ सहस्र रुपये किमतीचे २९८ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आहेत. आरोपींच्या विरुद्ध ठाणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण तसेच मीरा-भाईंदर-वसई-विरार परिसरात घरफोडीचे तब्बल ५३ गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका

धर्मांधांना कायद्याचे भय वाटत नसल्यानेच त्यांच्याकडून पुनःपुन्हा गुन्हे करण्याचे धाडस होते ! हे आरोपी आता जामिनावर सुटणार नाहीत, एवढी तरी किमान काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे !