थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)


मुंब्रा येथे मित्राची हत्या करणारे धर्मांध अटकेत

ठाणे, १६ जुलै (वार्ता.) – मुंब्रा परिसरातील एका तरुणाची निर्घृण हत्या करून त्याचे मुंडके आणि दोन्ही हात धडापासून वेगळे करून ओळख पटू नये म्हणून प्रेत निर्जनस्थळी टाकणार्‍या फैज सुलतान मालीम (वय २४ वर्षे) आणि अल्बान सुलतान मालीम (वय २३ वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी हत्या करतांनाचे चित्रीकरण केले होते. तो भ्रमणभाषसंच पोलिसांनी जप्त केला असून मुंब्रा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका 

  • अल्पसंख्यांक धर्मांधांचे गुन्हेगारीत अधिक प्रमाण !
  • क्रूर मानसिकतेचे धर्मांध मित्रालाही सोडत नाहीत !

पोलिसांवर आक्रमण करणार्‍या रिक्शाचालकाला शिक्षा

ठाणे – डोंबिवली येथे पोलिसांच्या चौकशीच्या वेळी सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांवर आक्रमण करणारा रिक्शाचालक ऋषिकेश क्षीरसागर (वय ३१ वर्षे) याला कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ३ महिन्यांची साधी कैद आणि ५ सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रवासी रिक्शातून लोखंडी सळ्यांची वाहतूक केल्याच्या संशयावरून मानपाडा पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने पोलिसांवर आक्रमण करून एकाचा गणवेश फाडला होता.


समुद्रात २ जण बुडले ! पोलिसांची चेतावणी न ऐकल्याचा परिणाम !

विरार – अर्नाळा समुद्रकिनारी १६ जुलै या दिवशी सकाळी २ अल्पवयीन मुले समुद्रात बुडली. चौघांपैकी दोघांना पोलीस आणि होमगार्ड जवानांनी वाचवले, तर अन्य दोघे बेपत्ता असून त्यांचा शोध चालू आहे. किनार्‍यावर गस्त घालणारे पोलिसांनी त्यांना ‘समुद्रात उतरू नये’, अशी सूचना देत हटकले होते. पथक निघून गेल्यानंतर ही मुले पुन्हा समुद्रात उतरली. काही वेळातच मुलांनी साहाय्यासाठी आरडाओरड चालू केली. येथे चेतावणी फलकही पोलिसांनी लावले आहेत.


वर्धा येथे मुलीची निर्घृण हत्या !

वर्धा – जिल्ह्यातील सावंगी येथे एका १२ वर्षीय मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. एका शेतातील घरात या बालिकेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडल्याने तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय आहे. मुलगी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी परतली होती. त्या वेळी घरात कुणीही नव्हते. मृतदेह उत्तरीय पडताळणीसाठी पाठवण्यात आला आहे. मुलीचे कुटुंब शेतमजुरी करून उदरनिर्वाह करते.