गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !

राष्ट्रप्रेमी प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा दावा

बांगलादेशी घुसखोरी (प्रतिकात्मक चित्र)

मडगाव, १६ जुलै (वार्ता.) – गोव्यात रोहिंग्या आणि बांगलादेशी मिळून अनुमाने ४० सहस्र जण वास्तव्यास असल्याचा दावा प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केला. कुंकळ्ळी येथे एका कार्यक्रमानंतर प्रा. सुभाष वेलिंगकर पत्रकारांशी संवाद साधत होते. त्या वेळी प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी पुढील महत्त्वाची सूत्रे सांगितली.

१. कुंकळ्ळी मतदारसंघ हा अनधिकृत वास्तव्याचे प्रमुख केंद्र आहे. याची माहितीही सरकारला आहे. रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक यांना शिधापत्रिका (रेशनकार्ड) आणि मतदार ओळखपत्र देऊन त्यांचा निवडणुकांमध्ये वापर केला जातो.

२. ‘रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक यांच्यावर कारवाई का होत नाही ?’, असा प्रश्न मी एका निवृत्त पोलीस अधिकार्‍याला विचारला होता. यावर तो अधिकारी म्हणाला, ‘‘त्यांना ठेवण्यासाठी स्वतंत्र केंद्र नसल्याने त्यांना ‘हाऊस कन्फाइनमेंट’मध्ये (म्हणजे घरातच लक्ष) ठेवले जाते.

३. काही प्रकरणी रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते. ‘पैसे दिल्यास कोठडीत टाकले जाणार नाही’, असे त्यांना काही जण सांगतात. काही कार्यकर्ते त्यांना ‘पोलीस कोठडीत गेल्यास घाबरू नका, आम्ही तुम्हाला लगेच सोडवून आणू’, असेही सांगतात. अशा विविध कारणांमुळे गोव्यात अवैधपणे वास्तव्य करणारे रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक यांच्यावर कारवाई होत नाही. मुसलमान धर्मप्रचारक झाकीर नाईक यांच्यासमवेत काही गोमंतकियांची छायाचित्रे माझ्याकडे आहेत.