टी.आर्.टी.आय. पुणे येथील निविदा प्रक्रियेत घोटाळा प्रकरण

पुणे – ‘आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे’कडून (टी.आर्.टी.आय.) राबवण्यात येणार्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेतील निविदा प्रक्रियेत घोटाळा झाला. या घोटाळ्याचे सखोल अन्वेषण करण्यासाठी उच्चस्तरीय ३ सदस्यांची समिती स्थापन करणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे ६ दिवसांमध्ये तडकाफडकी स्थानांतर केल्याचे समजते. चौकशी समिती स्थापन झाल्यामुळे अधिकारी आणि अॅकॅडमी चालकांनी मंत्रालयातील उच्चपदस्थांवर राजकीय दबाव आणून डॉ. मनोळकर यांचे स्थानांतर केल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
१. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने ८ जुलै २०२६ या दिवशी जारी केलेल्या आदेशानुसार डॉ. मनोळकर यांच्या जागी श्रीधर दुबे यांची नियुक्ती करण्यात आली. हे आदेश सहसचिव सुभाष उमराणीकर यांच्या स्वाक्षरीने दिले आहेत.
२. ‘इग्नाईट अॅकॅडमी पुणे’ या संस्थेकडे आवश्यक ५ वर्षांचा अनुभव नाही, १ कोटी रुपयांची उलाढाल (टर्न ओव्हर) दाखवणारे सनदी लेखपालाचे प्रमाणपत्रही बनावट आहे. वर्ष २०११ ते २०२४ या कालावधीत या संस्थेने एकही ‘जी.एस्.टी. इन्व्हॉईस’ (कर चलन) सादर केलेले नाही.
३. प्रशासनाच्या या कारभाराविषयी ‘ऑल इंडिया इंडिजिनस स्टुडंट्स फेडरेशन’च्या आदिवासी विद्यार्थ्यांनी टी.आर्.टी.आय. कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते.
४. विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधानंतर तत्कालीन आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांनी २ जुलै २०२६ या दिवशी उच्चस्तरीय चौकशी समिती जाहीर केली होती.
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद