
पंढरपूर – आषाढी यात्रेच्या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन १६ जुलैच्या शुभमुहूर्तावर विधीवत् पूजा करून श्रींचा (श्री विठ्ठल) पलंग काढण्यात आला आहे. श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड, तर श्री रुक्मिणीमातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ घंटे दर्शन, तर २२ घंटे १५ मिनिटे पदस्पर्श दर्शन चालू रहाणार असल्याची माहिती ‘मंदिरे समिती’चे सह-अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
श्रींचा पलंग काढल्यानंतर काकड आरती, पोशाख, धूपारती, शेजारती आदी राजोपचार तात्पुरते बंद रहातील; मात्र नित्यपूजा, महानैवेद्य आणि गंधाक्षता हे नित्योपचार नियमितपणे चालू रहातील. दर्शनरांगेत संरक्षक जाळी बसवून घुसखोरी रोखण्यात आली आहे. विशेष दर्शन आणि टोकन दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली असून भाविकांच्या हस्ते होणार्या पूजासुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. दर्शनरांगेतील रहदारी सुरळीत रहाण्यासाठी तात्पुरत्या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !