सचिन वाझे याला पुन्हा सेवेत घेणे, ही सरकारची चूक ! – अबू आझमी

अबू आझमी

मुंबई – सचिन वाझे याला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यास माझा विरोध होता. त्यासाठी मी शरद पवार, संजय राऊत आणि अनिल देशमुख यांना सांगितले होते; पण माझे ऐकले गेले नाही. सरकारने ही मोठी चूक केली, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.

या वेळी अबू आझमी म्हणाले, ‘‘विधीमंडळात विरोध पक्षाच्या नेत्यांनी मागणी केल्यानंतर वाझे याला निलंबित करायला हवे होते. त्या माणसाचे चारित्र्य पहिल्यापासून खराब आहे. गृहमंत्र्यांवर आरोप करणार्‍या परमबीर सिंह यांच्यावरच पहिली कारवाई व्हायला हवी. गृहमंत्री वसुली करायला सांगत होते, तर त्याची कल्पना शरद पवार आणि मुख्यमंत्री यांना आधीच का दिली नाही ? खरेतर परमबीर सिंह हे स्वत:च पूर्वीपासून वसुलीचे काम करतात. त्यांच्या विरोधात त्याविषयीच्या अनेक तक्रारी आहेत.’’