उत्तरप्रदेशमधील पंचायत निवडणुकीत समाजवादी पक्षाची सरशी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील पंचायत निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाने बाजी मारल्याचे, तर भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्याचे चित्र दिसून आले आहे. विशेष म्हणजे अयोध्या, काशी आणि मथुरा या जिल्ह्यांतही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.

अयोध्येत ४० पैकी २४ जागा समाजवादी पक्षाला, तर केवळ ६ जागा भाजपला मिळाल्या आहेत. येथे १३ जागांवर भाजपमध्ये बंडखोरी झाली होती. काशीमध्ये ४० पैकी केवळ ८ जागा भाजपला मिळाल्या आहेत. मथुरेमध्ये बहुजन समाज पक्षाला १२, राष्ट्रीय लोकतांत्रिक दलाला ९, तर भाजपला केवळ ८ जागा मिळाल्या आहेत.