
पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दिघी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक चैताली गापट यांना ३ लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. (लाच घेण्यात पोलीस विभाग सर्वांत पुढे ! – संपादक) ही लाच दिघी पोलीस ठाण्यात घेतांना कारवाई केली. या प्रकरणी एका ४२ वर्षीय व्यक्तीने लाच देणे मान्य नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती.
तक्रारदारांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्याचे अन्वेषण महिला पोलीस उपनिरीक्षक चैताली या करत होत्या. गुन्ह्यात साहाय्य करण्यासाठी, भविष्यातही साहाय्य करण्याचे आमीष दाखवून ८ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ती रक्कम ३ लाख रुपये अशी ठरली. चैताली यांना ३ लाख रुपये स्वीकारतांना पथकाने अटक केली. (लाचखोर पोलीस अधिकार्याला कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल ! – संपादक)
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !