भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार ! 

कोल्हापूर – भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर फुलेवाडी रिंग रोड परिसरातील नाना पाटील चौकाजवळ अज्ञातांनी गोळीबार केला. सूरज यांच्यावर ३ गोळ्या चालवण्यात आल्या असून यातील २ गोळ्या सूरज यांना लागल्या आहेत. सूरज यांच्यावर पूर्वी काही गुन्हे नोंद होते. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. यामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. गोळीबारात घायाळ झालेल्या सूरज साखरे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार चालू असून गोळीबार कशामुळे झाला ? याविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.