संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले

पालखी सोहळ्याच्या रिंगणामध्ये सहभागी वारकरी

सातारा – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण फलटण तालुक्यातील तरडगावाच्या जवळ चांदोबाचा लिंब येथे पार पडले. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषात लाखो वैष्णवांनी या नेत्रदीपक सोहळ्याचा लाभ घेतला.