श्रीरामंदिरासाठी अर्पण गोळा करणार्‍या भाजप कार्यकर्त्यांवर विकले गेलेले मुसलमान दगडफेक करतील आणि त्याचा भाजप राजकीय लाभ उठवेल !

समाजवादी पक्षाचे खासदार एस.टी. हसन यांचा दावा

असा दावा करून हसन दगडफेक करणार्‍या धर्मांधांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही !

एस्.टी. हसन

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिराचा वाद समाप्त झाला आहे; मात्र भाजपचे लोक श्रीराममंदिरासाठी अर्पण गोळा करण्यासाठी समाजात जातील, तेव्हा काही विकल्या गेलेल्या मुसलमानांकडून ते स्वतःवर दगडफेक करवून घेतील. यानंतर जे काही होईल, ते तुम्ही मध्यप्रदेशातील घटनेमध्ये पाहिले आहे. अशा घटनेद्वारे हिंदूंना ‘मुसलमान कशी स्थिती निर्माण करू शकतात’, असा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला जाईल. अशा प्रकारे भाजप निवडणुकीमध्ये लाभ मिळवण्याचा प्रयत्न करील, असा दावा येथील समाजवादी पक्षाचे खासदार एस्.टी. हसन यांनी केला.

(सौजन्य : republic facebook)

खासदार हसन पुढे म्हणाले की, भाजपचे राजकारण समजून घेण्याची आवश्यकता आहे. शेवटी अशा प्रकारचे राजकारण कधीपर्यंत चालणार ? हिंदु-मुसलमान असा भेद करण्याने पोट भरणार नाही. भाजप निवडणुकीमध्ये ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहे.