संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !

लोणंद नगरीतून तरडगावकडे प्रस्थान ठेवतांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा

लोणंद – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याने लोणंद ते तरडगाव असे प्रस्थान ठेवले. ‘नीरा स्नान’ करून वारकरी लोणंद मुक्कामी पोचतात. येथे माऊलींच्या कृपाशीर्वादाने भक्ताला भक्तीचा अलौकिक आनंद प्राप्त होतो. या टप्प्यावर भक्ताला संसारातील दुःख आणि मोह यांचा फोलपणा हळूहळू समजू लागतो. हा संपूर्ण मार्ग टाळ-मृदंगांचा गजर आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या नामाच्या जयघोषात वारकरी चालतो !