१ लाख २५ सहस्र रुपयांची लाच मागणारा ठाणे येथील कार्यालय अधीक्षक कह्यात

ठाणे, १६ जुलै (वार्ता.) – ‘युनिटी इंडस्ट्रियल पार्क प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ची नोंदणी करून देण्यासाठी १ लाख २५ सहस्र रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ठाणे सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधीक्षक सुधाकर बळीराम राठोड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे. तक्रारदाराने ६ एप्रिल २०२६ या दिवशी दिलेल्या तक्रारीनंतर ६ आणि ७ एप्रिलला झालेल्या पडताळणीत राठोड यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी १ लाख रुपये आणि स्वतःसाठी २५ सहस्र रुपये, अशी एकूण १ लाख २५ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी. – संपादक) या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.

संपादकीय भूमिका

सर्वच शासकीय कार्यालयांत असणारी भ्रष्टाचाराची बजबजपुरी संपवण्यासाठी आता आदर्श राज्य हवे !