मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला

ठाणे – मीरारोड येथील महानगरपालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार चालू असतांना चिमणीचा भाग अचानक कोसळला. घटनेच्या वेळी मृताच्या नातेवाइकांसह अनेक नागरिक उपस्थित होते. सुदैवाने चिमणीचा भाग कुणाच्याही अंगावर न पडल्याने जीवितहानी टळली. या घटनेनंतर स्मशानभूमीतील संरचनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

संपादकीय भूमिका

या घटनेला उत्तरदायी असलेल्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !