Pakistani Slogans By Indian Muslim : फेसबूकवरून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा; पंतप्रधान मोदी यांचा अवमान !

आरोपी असगरच्या विरोधात गुन्हा नोंद !

चिक्कमगळूरू (कर्नाटक) – जिल्ह्यातील कोप्पा शहरात असगर नावाच्या व्यक्तीने त्याच्या फेसबूक खात्यावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’, असे लिहिले. एवढेच नव्हे, तर पंतप्रधान मोदी आणि बजरंग दल यांच्याविरुद्ध अवमानकारक पोस्ट केली. ही पोस्ट केल्यावर त्याने थोड्याच वेळात त्याचे हे फेसबूक खाते ‘डिलीट’ केले.

पोलिसांनी सदर पोस्टवर आधारित गुन्हा नोंदवला असून असगरचा शोध घेतला जात आहे. असगरविरुद्ध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही संताप व्यक्त केला आहे.