
रत्नागिरी – जिल्ह्यातील वेद आणि शास्त्र या विषयातील २ दिग्गज वेदमूर्ती वैदिकमार्तंड आणि वैदिक शिरोमणी (कै.) विनायक आठल्येगुरुजी अन् व्याकरणाचार्य (कै.) पु.ना. फडकेशास्त्री यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत झाडगाव येथील संस्कृत पाठशाळेमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रम पत्रिका –

या निमित्ताने २३ ते २७ फेब्रुवारीला प्रतिदिन सकाळी ७.३० ते १२.३० या वेळेत ऋग्वेद संहिता पारायण वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणेगुरुजी करतील. संस्कृत पाठशाळेत २३ आणि २४ ला सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत ह.भ.प. निशिकांत टेंगशे (गोवा) कीर्तनसेवा करणार आहेत. २५ ते २७ फेब्रुवारीला प्रतिदिन वेदशाळेमध्ये सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत वेदशाळा येथे ब्रह्मवर्चसकाम श्रौतयज्ञाचे (ब्रह्मणस्पति इष्टि, पवित्रेष्टि, मित्रविंदेष्टि) आयोजन केले आहे. वेदमूर्ती गणेश जोगळेकरगुरुजी (गोकर्ण, महाबळेश्वर) हे पौरोहित्य करतील. २५, २६ आणि २७ फेब्रुवारीला प्रतिदिन दुपारी ४ ते सायंकाळी ६ आणि सायंकाळी ६.३० ते रात्री ८ या वेळेत वेदमूर्ती सचिन भाटवडेकरगुरुजी (कडावल) हे रामकथा (बालकांड, भरत चरित्र, हनुमान चरित्र) या विषयावर निरुपण करतील. २७ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता संस्कृत पाठशाळेत वेदमूर्ती घनपाठी दिनकरगुरु माधव फडके, पुणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सर्व माजी विद्यार्थी आणि वेदमूर्ती वैदिक मार्तंड आणि वैदिक शिरोमणी (कै.) विनायक आठल्येगुरुजी अन् व्याकरणाचार्य (कै.) पु.ना. फडकेशास्त्री स्मृती समितीने केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष कुवळेकर (९४२२४३०३१५ / ७०२०१३१७७४) किंवा सचिन आठल्ये (९९७०८४१४७७) यांच्याशी संपर्क साधावा.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा