शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) पैसे घेऊन ७ सहस्र ९०० जणांचे गुण वाढवले !

उमेदवारांना पात्र करण्यासाठी प्रश्नपत्रिका सोडवतांना काही सांकेतिक शब्द (कोडवर्ड) दिले होते. त्यामुळे या उमेदवारांनी ओ.एम्.आर्. शीटमध्ये मार्क वाढवले असल्याचे समोर आले आहे

कोविड केंद्राच्या निविदेत भ्रष्टाचार ! – किरीट सोमय्या, भाजप खासदार

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचे काम आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पैशासाठी त्यांनी मुंबई आणि पुणे येथील नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे.

डिजिटल करन्सी ‘रूपी’ म्हणजे क्रिप्टो करन्सी (आभासी चलन) नाही ! – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

याविषयी त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, रिझर्व्ह बँकेच्या अधिकाराच्या बाहेर असणार्‍या कोणत्याही चलनाला आम्ही चलन म्हणणार नाही. आम्ही ‘रूपी’ चलनावर कोणताही कर लावणार नाही.

भारताची राज्यघटना नव्याने लिहिण्याची आवश्यकता ! – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

भारताची राज्यघटना नव्याने लिहिण्याची आवश्यकता आहे. देशातील सर्व नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असून त्यांना ‘माझ्या समवेत लढणार का ?’, असे विचारणार आहे.

अनुसूचित जनजातीतील नागरिकांना धर्मांतरित करण्याचा कुटील डाव हाणून पाडावा ! – मिलिंद परांडे, केंद्रीय महामंत्री, विहिंप

धर्मांतर करणार्‍या नागरिकांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असा कायदा हवा !

नवज्योतसिंह सिद्धू यांनी पैशांसाठी स्वतःच्या वृद्ध आईला घराबाहेर काढले होते ! – सिद्धू यांच्या बहिणीचाच आरोप

‘‘वडिलांच्या मृत्यूनंतर वर्ष १९८६ मध्ये सिद्धू यांनी मला आणि आईला बाहेर काढले. वर्ष १९८९ मध्ये रेल्वे स्थानकावर माझ्या आईचा मृत्यू झाला. मी जे काही सांगत आहे त्याचे कागदोपत्री पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत.

किराणा मालाच्या दुकानात ‘वाईन’ विक्रीचा सरकारचा निर्णय राष्ट्रघातक आणि समाजाला हानीकारक ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला असलेला जनतेचा विरोध लक्षात घेऊन तो निर्णय रहित करावा !

गैरव्यवहार करणार्‍यांवर महापालिका आयुक्तांनी कठोर कायदेशीर कारवाई करावी ! – वैद्य उदय धुरी, समन्वयक, सुराज्य अभियान

एवढ्या मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार होईपर्यंत पालिकेचा लेखा विभाग आणि लेखा परीक्षण विभाग काय करत होते ? संबंधितांकडून रक्कम वसूल करुन कठोर शासन करा !

(म्हणे) ‘देव माझ्या अंतर्वस्त्राचे माप घेत आहे !’

हिंदू संघटित नसल्यामुळेच वारंवार कुणीही देवतांचा अवमान करतो ! हिंदूंनी संघटित होऊन याचा तीव्र आणि वैध मार्गाने निषेध करायला हवा आणि संबंधित अभिनेत्रीला क्षमा मागण्यास भाग पाडायला हवे !

भाजप सरकारी यंत्रणेचा वापर करत असल्याचा काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांचा आरोप

काँग्रेसचे सुनील कवठणकर म्हणाले, ‘‘लोकशाहीची तत्त्वे धोक्यात आली आहेत. भाजपचे नेते १० किंवा त्याहून अधिक समर्थकांसह त्यांचा प्रचार करत आहेत; परंतु त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही.