डिजिटल करन्सी ‘रूपी’ म्हणजे क्रिप्टो करन्सी (आभासी चलन) नाही ! – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

नवी देहली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी अर्थसंकल्प सादर करतांना ‘रिझर्व्ह बँक ‘रूपी’ नावाची ‘डिजिटल करन्सी’ (चलन) चालू करणार आहे’, असे सांगितले होते. याविषयी त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, रिझर्व्ह बँकेच्या अधिकाराच्या बाहेर असणार्‍या कोणत्याही चलनाला आम्ही चलन म्हणणार नाही. आम्ही ‘रूपी’ चलनावर कोणताही कर लावणार नाही. याला ‘क्रिप्टो’ (आभासी) नाही, तर ‘डिजिटल करन्सी’ असेच म्हटले जाणार. रिझर्व्ह बँकेच्या अधिकाराच्या बाहेरील करन्सीच्या लाभावर ३० टक्के कर आकारण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.