मुंबई – कोविड केंद्राच्या निविदेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. संजय राऊत यांच्या निकटवर्तियांना दिलेल्या या कामांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाद्वारे चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
Kirit Somaiya Full PC : ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची माझ्यात नशा आहे – किरीट सोमय्याhttps://t.co/UBpr9WEHCe #Mumbai #Maharashtra #KiritSomaiya #BJP #ठाकरेसरकार @KiritSomaiya
— ABP माझा (@abpmajhatv) February 9, 2022
सोमय्या पुढे म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचे काम आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पैशासाठी त्यांनी मुंबई आणि पुणे येथील नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे. ५८ कोटी रुपयांचे कंत्राट सुजित पाटकर यांना मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांनी दिले. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे भागीदार आहेत. सुजित पाटकर यांनी अशी सात कंत्राटे मिळवली आहेत. या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाद्वारे चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.