अवैध पशूवधगृह चालकांवर तात्काळ कारवाई करण्याविषयी पाळधी (जळगाव) येथील ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

अवैध पशूवधगृह बंद करण्यासाठी ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांना निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ?

मुसलमान पतीकडून हिंदु पत्नीला उर्दू आणि अरबी शिकण्यासाठी दबाव अन् मारहाण

येथे हिंदु तरुणी ज्योती दहियाने महंमद इर्शाद खान याच्याशी विवाह केला होता. आता महंमद इर्शाद तिच्यावर उर्दू आणि अरबी भाषा शिकण्यासाठी दबाव टाकत असून त्यासाठी तिला मारहाण करत आहे.

येत्या ४ वर्षांत राज्यातील पोलिसांसाठी १ लाख घरे बांधणार ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

पोलिसांच्या घरांचा प्रश्‍न अतिशय महत्त्वाचा आहे. पुढील ४ वर्षांत राज्यातील पोलिसांसाठी १ लाख घरे बांधण्याचे नियोजन आम्ही करत आहोत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या

आत्महत्येच्या ८ घंट्यांपूर्वी सकाळी ५.४५ वाजता डॉ. शीतल यांनी ‘युद्ध आणि शांतता’ नावाचे स्वत: काढलेले चित्र ‘ट्विटर’वर ‘पोस्ट’ केले आहे.

श्रीलंकेतील कारागृहातील हिंसाचारात ८ कैद्यांचा मृत्यू, तर ३७ जण घायाळ

काही कैद्यांनी कारागृहामधून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर कारागृह प्रशासनाला त्यांच्या विरोधात बळाचा वापर केल्यावर ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहादविरोधी पहिला गुन्हा नोंद

उत्तरप्रदेश सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा संमत केल्यानंतर बरेली येथे पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिंदु तरुणीला विवाहासाठी धर्मांतर करण्याचा दबाव टाकल्यावरून तरुणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान कुटुंबाकडून हिंदु तरुणीचे अपहरण केल्याची वडिलांची तक्रार

येथे २१ वर्षीय हिंदु मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीचे त्यांच्या शेजारी रहाणार्‍या मुश्ताक कुटुंबाने अपहरण केल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात केली आहे. मुलीच्या जीविताला धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

देहलीत शिवशक्ती मंदिरातील १२ हून अधिक मूर्तींची तोडफोड

देहलीतील पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांकडून तळोजा (जिल्हा रायगड) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्याविषयी पोलीस आयुक्तांकडे तक्रार

पोलीस आयुक्तांनी या गंभीर आरोपांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे !

देशभरात वाढलेली महिला आणि मुली बेपत्ता होण्याची प्रकरणे, हा गंभीर प्रश्‍न !

वर्ष २०१५ पासून महाराष्ट्रातून २६ सहस्रांहून अधिक व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. यांपैकी महिला आणि मुली हरवल्याचे प्रमाण २१ सहस्रांहून अधिक आहे. यात गत ४ ते ६ वर्षांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.