येत्या ४ वर्षांत राज्यातील पोलिसांसाठी १ लाख घरे बांधणार ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

मुंबई – पोलिसांच्या घरांचा प्रश्‍न अतिशय महत्त्वाचा आहे. पुढील ४ वर्षांत राज्यातील पोलिसांसाठी १ लाख घरे बांधण्याचे नियोजन आम्ही करत आहोत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली.