गंगा नदीच्या काठावरील तीर्थक्षेत्रे ही राष्ट्राच्या एकात्मतेचे आधारस्तंभ !

हरिद्वार, प्रयाग आणि काशी यांसारख्या तीर्थक्षेत्रांची पवित्रता गंगेच्या प्रवाहामुळेच जागृत आहे. गंगेचा जलस्तर न्यून झाल्यास कोट्यवधी लोकांच्या भावनांवर आणि श्रद्धेवर आघात केल्यासारखेच होईल.

विठ्ठलाकडे जाण्‍याचा ‘मार्ग’ प्रशस्‍त ! 

मंदिर परिसराच्‍या विकासासमवेत मंदिरांना भक्‍तीरस आणि धर्मशिक्षण यांची केंद्रे बनवा !

मंदिरे पर्यटनस्थळे नाहीत !

प्रत्येक भाविकाने तीर्थस्थळ किंवा देवालय हे निव्वळ पर्यटनस्थळ नसून आपले ऊर्जा स्थान आहे, हे लक्षात घ्यावे.

जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी हे पर्यटनस्थळ करणार नाही !  

झारखंड येथील सम्मेद शिखरजी हे जैन तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्रच राहील, त्याचे पर्यटनस्थळात रूपांतर केले जाणार नाही, असा निर्णय केंद्रशासन आणि झारखंड शासन यांनी घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बालसिंह लालपुरा यांनी दिली.

तीर्थक्षेत्रांना पर्यटनाचा दर्जा देण्‍यात आल्‍यास असंतोष निर्माण होईल ! – केतन शहा

‘सम्‍मेद यात्रा पूर्ण केल्‍याविना आमचे जीवन अपूर्ण आहे’, असे आम्‍ही मानतो. सरकारने केवळ ‘सम्‍मेद शिखरजी’च नव्‍हे, तर हिंदूंच्‍या सर्वच पवित्र स्‍थळांना ‘तीर्थक्षेत्र’ म्‍हणून घोषित करायला हवे. हिंदु आणि जैन समाज हे भिन्‍न नाहीत.

सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाऐवजी तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी जैन समाजाचा इचलकरंजी (कोल्हापूर) येथे मोर्चा !

झारखंड सरकारने जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाचा दिलेला दर्जा रहित करून तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी जैन समाजाने २६ डिसेंबरला प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी निवेदन स्वीकारले.

तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील बसस्थानकाची दुरवस्था !

श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यभरातून सहस्रो भाविक येथे येत असतात; मात्र येथील प्रवासी सुविधेकडे दुर्लक्ष होत आहे. बसस्थानकाच्या इमारतीचे छत नादुरुस्त झाल्याने ते कोसळण्याच्या स्थितीत आहे. 

काशी विश्वेश्वराचा पुरातन इतिहास आणि मोगलांनी मंदिरावर केलेले आक्रमण

गेल्या काही मासांपासून काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशीद यांचे नाव चर्चेत आहे. वाराणसीत असलेल्या मूळ काशी विश्वेश्वराची ही जागा मोगल काळात बाटवली गेली आणि मंदिर पडून मशीद झाली, असे हे प्रकरण आहे.

काशी विश्वेश्वराचा पुरातन इतिहास आणि त्यावर झालेली आक्रमणे

गेल्या जवळपास काही मासांपासून काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशीद यांचे नाव चर्चेत आहे. अर्थात् या प्रकरणाशी महाराष्ट्राचा संबंध फार जवळचा आहे. म्हणूनच ज्ञानवापीचे प्रकरण काय आहे, ते थोडक्यात पाहू.

श्री क्षेत्र जेजुरीगड आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विकासकामांना संमती !

श्री क्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामास संमती देण्यात आली, तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करतांना त्या वास्तूची मूळ शैली जपणे आवश्यक असून पुरातत्वीय जाण असलेल्या संस्थेकडून ही कामे करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.