धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण
नागपूर – क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर काढून टाकण्याच्या मागणीसाठी आयोजित निदर्शनाच्या कालावधीत ‘धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी’ विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. या संदर्भात मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार प्रविष्ट केली आहे. गुन्हा नोंद करण्यात आलेल्यांमध्ये विश्व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रभारी गोविंद शेंडे, तसेच अमोल ठाकरे, डॉ. महाजन, रजत पुरी, सुशील, अर्खेल, शुभम आणि बारापात्रे यांचा समावेश आहे.