जैन तीर्थंकर प्रतिमा विटंबनेचा अल्पसंख्यांक आयोगाने घेतला आढावा !
कुंडल येथील जैन तीर्थ क्षेत्रावरील भगवान पार्श्वनाथांची प्रतिमा आणि पद्मावतीदेवीची प्रतिमा यांची विटंबना केल्याच्या प्रकरणाचा ‘जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळा’चे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी बैठकीत आढावा घेतला.