धर्मांधाच्या अटकेसाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची पोलिसांकडे मागणी

भंडारा – येथे शोएब शेख याने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर औरंगजेबचे स्टेटस (स्टेटस म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी सामाजिक माध्यमांवरील स्वतःच्या खात्यावरून प्रसारित केलेले चित्र किंवा लिखाण) ठेवले, तसेच अन्य धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावतील, अशा स्वरूपाच्या आक्षेपार्ह पोस्टही प्रसारित केल्या. या प्रकरणी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे २०० कार्यकर्ते, तसेच पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन धर्मांधाच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा सहमंत्री प्रकाश उमाशंकर पांडे यांनी तक्रार दिली होती.
काय आहे शोएबच्या आक्षेपार्ह पोस्टमध्ये ?
शोएब याने प्रसारित केलेल्या एका पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रावर ‘बादशाह तो बोहोत सारे थे ।’ असे लिहिले असून औरंगजेबाच्या चित्रावर ‘लेकिन बाप एक ही था ।’, असे नमूद केले आहे. अन्य धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावतील असे उद्गार इंग्रजीमध्ये लिहिले आहे. दुसर्या पोस्टमध्ये औरंगजेबाच्या चित्रासमोर अनेक लोक जमलेले असून तेथे ‘ना सजा ना माफी, तुम्हारी सिस्टम फाडने के लिए सिर्फ हजरत औरंगजेब आलमगीर का नाम ही काफी’, असा आवाज दिला आहे. त्यानंतर लगेच ‘बाप ही बाप रहेगा’ हे गाणे घातले होते.
शोएबने छत्रपती शिवाजी महाराज यांना न्यून लेखून आमच्या धार्मिक भावना दुखावल्याने त्याच्या विरोधात काररवाईची मागणी पांडे यांनी तक्रारीतून केली.
संपादकीय भूमिकाकायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचाच परिणाम ! |