जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी हे पर्यटनस्थळ करणार नाही !  

केंद्रशासन आणि झारखंड शासन यांचा निर्णय

नवी देहली – झारखंड येथील सम्मेद शिखरजी हे जैन तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्रच राहील, त्याचे पर्यटनस्थळात रूपांतर केले जाणार नाही, असा निर्णय केंद्रशासन आणि झारखंड शासन यांनी घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बालसिंह लालपुरा यांनी दिली. आयोगाने १८ जानेवारी या दिवशी या प्रकरणावर सुनावणी घेतली. त्यात दोन्ही शासनांकडून ही माहिती देण्यात आली, असे लालपुरा यांनी सांगितले. ‘याविषयी लवकरच अधिकृत आदेश प्रसारित केला जाईल’, असे आश्‍वासन झारखंड शासनाने दिले आहे. सम्मेद शिखरजी हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यास जैन समाजाने प्रचंड विरोध दर्शवत देशभर तीव्र निदर्शने केली होती.