इस्रायलच्या नव्या आक्रमणात ४०० हून अधिक जण ठार

तेल अविव (इस्रायल) : इस्रायल लढेल आणि जिंकेल. हमासने ओलीस ठेवलेल्या आमच्या लोकांना आम्ही परत आणू. हमासने आमच्या शहरांवर आक्रमण केले, आमच्या लोकांना मारले, आमच्या महिलांवर अत्याचार केले आणि आमच्या प्रियजनांचे अपहरण केले. हमासचा नाश होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही किंवा शांत बसणार नाही, असा पुनरूच्चार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केला. इस्रायलने १९ जानेवारीपासून चालू केलेला हमासविरुद्धचा युद्धविराम संपवला आहे. इस्रायलने १८ मार्चपासून पुन्हा चालू केलेल्या आक्रमणात गाझा पट्टीमध्ये ४०० हून अधिक लोक ठार झाले आहेत.
Prime Minister Benjamin Netanyahu, this evening:
“Hamas is responsible for this war.
It invaded our towns, murdered our people, raped our women and kidnapped our loved ones.
Hamas refused offer after offer to release our hostages.https://t.co/9uFyUkWvhy pic.twitter.com/NFOFtfjpJB
— Prime Minister of Israel (@IsraeliPM) March 18, 2025
४० सहस्र लोकांनी रस्त्यावर उतरून केला नेतान्याहू यांचा विरोध
१८ मार्चच्या रात्री पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात ४० सहस्रांहून अधिक लोक रस्त्यावर उतरले. गुप्तचर संस्थेचे प्रमुख शिन बेट रोनेन बार यांना हटवण्याच्या निर्णयाचा लोक निषेध करत आहेत.
इस्रायलने गाझामध्ये हमासच्या सरकारच्या पंतप्रधानाची हत्या केली
गाझा पट्टीमध्ये जिहादी आतंकवादी संघटना हमासकडून सरकार चालवले जात होते. या सरकारमध्ये पंतप्रधान असणारा आतंकवादी इस्साम दिब अब्दुल्ला अल्-दलिस याला इस्रायलने ठार मारले. अब्दुल्लाकडे हमासच्या संघटना आणि आतंकवादी कारवाया यांचे दायित्व होते. गेल्या २४ घंट्यांत इस्रायलने आक्रमण करून हमासच्या ३ प्रमुख आतंकवाद्यांना ठार मारले.