गंगा नदीच्या काठावरील तीर्थक्षेत्रे ही राष्ट्राच्या एकात्मतेचे आधारस्तंभ !

‘हरिद्वार, प्रयाग आणि काशी यांसारख्या तीर्थक्षेत्रांची पवित्रता गंगेच्या प्रवाहामुळेच जागृत आहे. गंगेचा जलस्तर न्यून झाल्यास कोट्यवधी लोकांच्या भावनांवर आणि श्रद्धेवर आघात केल्यासारखेच होईल. गंगा नदीत भरपूर पाणी असल्यानेच तिच्या किनार्‍यावर वसलेल्या तीर्थक्षेत्रांना महत्त्व आहे. ही तीर्थक्षेत्रे राष्ट्राच्या एकात्मतेचे सर्वांत मोठे आधारस्तंभ आहेत.

भारतीय संस्कृतीची प्राणरेखा गंगा गोमुखातून निघून गंगासागरापर्यंत अखंड वहाण्यासाठी आपण स्वतःही निसर्ग आणि पर्यावरण यांच्या रक्षणाचा संकल्प घ्यावा लागेल.’

(साभार : मासिक ‘गणानाम् त्वां’, जुलै २०१४)