संपादकीय : हिंदुद्वेष आणि मुसलमानांवरील प्रेम ! 

उपमुख्यमंत्री अजित पवार

रमझानचा काळ चालू असल्याने गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे नेते इफ्तार मेजवानीला उपस्थित रहात आहेत. अशाच प्रकारची इफ्तार मेजवानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे आयोजित केली होती. या इफ्तार मेजवानीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले, ‘‘मुसलमानांना डोळे दाखवणार्‍यांना सोडणार नाही, मग तो कुणीही असो. तुमचा भाऊ तुमच्यासमवेत आहे. जो कुणी मुसलमान बांधवांना आव्हान देईल, जो २ गटांमध्ये संघर्ष निर्माण करून कायदा-सुव्यवस्था बिघडवेल आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करील, तो कुणीही असो, त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही किंवा क्षमा केले जाणार नाही.’’ ते पुढे असेही म्हणाले, ‘‘रमझान हा केवळ एका धर्मापुरता मर्यादित नाही. तो आपल्याला एकता आणि बंधुत्व यांचा संदेश देतो. भारत विविधतेत एकतेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, म. फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांनी जातींना एकत्र आणून समाजाच्या उन्नतीचा मार्ग दाखवला. आपल्याला हा वारसा पुढे चालवायचा आहे.’’

अजित पवार वादग्रस्त नेते ! 

खरेतर येथे प्रश्न उपस्थित होतात की, मुळात मुसलमानांचे सण एकता आणि बंधुत्व यांचा संदेश देतात का ? ‘मुसलमानांना भाऊ म्हणणार्‍या’ नेत्यांना हिंदू शत्रू वाटतात का ? आतापर्यंत धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना डोळे दाखवून त्यांच्यावर अत्याचार केले आहेत. रमझान हा केवळ इस्लाम पंथासाठी आहे. तो सण अन्य कुणी साजरा करत नाहीत. या बोलण्यातून ‘मुसलमानांचे लांगूलचालन करायचे आणि त्यांची मते मिळवायची, हाच एककलमी कार्यक्रम काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या नेत्यांनी आजपर्यंत राबवला आहे’, हेच दिसून येते. या दोन्ही पक्षांतील नेत्यांना मुसलमानांवर झालेले अत्याचार लगेच दिसून येतात; मात्र मोगलांपासून आजपर्यंत हिंदूंवर झालेले अनन्वित अत्याचार दिसत नाहीत. उलट ते त्याकडे कानाडोळा करून मुसलमानांचे तुष्टीकरण आणि हिंदूंचे खच्चीकरण करतात, हा इतिहास आहे.

धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीवर मौन का ? 

नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खान

१७ मार्च या दिवशी नागपूर येथे मुसलमान धर्मांधांनी दंगल घडवली. नागपूर येथे झालेल्या दंगलीच्या प्रकरणी १ सहस्र २५० संशयितांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यातील २०० जणांची ओळख पटली असून १०५ जणांना अटक करण्यात आली आहे. या दंगलीचा मुख्य सूत्रधार फहीम खान आहे. हिंदु सण-उत्सवांच्या वेळी मशिदीसमोरून मिरवणूक गेली, गुलाल उधळला, ‘औरंगजेबाची कबर हटवा’ ही घोषणा देणे, अशा विविध क्षुल्लक कारणांवरून धर्मांधांकडून दंगली घडवल्या जातात. हिंदूंच्या मालमत्तांची हानी करून प्रसंगी हिंदूंनाही ठार करण्यात धर्मांध मागेपुढे पहात नाहीत. मुळात दंगली घडवण्याच्या षड्यंत्रात धर्मांधांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या अन्वेषणातून उघड झाले आहे, तरीही पोलीस हिंदूंवर अत्याचार करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करतात. गोवंशियांची अनधिकृत वाहतूक आणि त्यांची निर्दयपणे हत्या केल्यानंतरही पोलीस धर्मांध मुसलमानांना अटक न करता गोरक्षकांना अटक करतात. भारताचा इतिहास पाहिला असता मोगलांनी हिंदूंवर अत्याचार केले, तसेच अत्याचार काँग्रेसची सत्ता असतांना हिंदूंवर झाले आहेत. तरी याविषयी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे नेते काहीही बोलत नाहीत. नागपूर दंगलीतील धर्मांध आणि घुसखोर यांच्याविषयीची एवढी माहिती उघड होत असतांनाही अजित पवारांसारखे अनेक नेते यावर अवाक्षरही बोलत नाहीत. याचे कारण मुसलमानांचे लांगूलचालन !

केवळ हिंदूंचे खच्चीकरण !   

सध्या अनेक हिंदु महिलांवर धर्मांधांकडून अत्याचार केले जात आहेत, तसेच ३० वर्षांपासून ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदूंच्या मुलींना पळवून त्यांचे बळजोरीने धर्मांतर अथवा त्यांची हत्या केली जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशावर ६० वर्षे काँग्रेसची सत्ता होती. या सत्ताकाळात काँग्रेसने मुसलमानांचे इतके लांगूलचालन केले की, आजही ही परिस्थिती पालटलेली नाही. असे असतांनाही केवळ मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची ही पिलावळ आजही हिंदूंच्या विरोधात कटकारस्थान करून हिंदूंचे खच्चीकरण अन् मुसलमानांचे तृष्टीकरण करत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार म्हणाले, ‘‘मी छत्रपती संभाजीनगर म्हणणार नाही, तर औरंगाबाद म्हणीन.’’ यावरून शरद पवार यांचे मुसलमान आणि औरंगजेब यांविषयी किती प्रेम आहे, हे दिसून येते. त्यामुळे अशा नेत्यांना भारतात नव्हे, तर पाकिस्तानात कायमचे पाठवले पाहिजे, असे कुणी म्हटल्यास त्यात चूक काय ?

हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी रोखठोक भूमिका घ्यावी ! 

काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेस असो या दोन्ही पक्षांनी नियमित अंतराने दंगे होत रहातील आणि दंगेखोरांना शिक्षा होणार नाही, याची पक्की निधर्मी व्यवस्था करून ठेवली आहे. देशात धर्मांध मुसलमानांनी दंगली घडवल्या, तरी यात सहभागी असलेल्या धर्मांध मुसलमानांना कठोर शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नेते प्रत्येक हिंसाचाराच्या घटनेनंतर हिंदुत्वनिष्ठांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतात; मात्र धर्मांधांनी दंगली घडवल्यानंतर त्याचा साधा निषेधही करत नाहीत. ‘हिंदुत्वनिष्ठांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला की, ‘राज्यघटनेची पायमल्ली होत आहे’, अशी आरोळी ठोकायची आणि अल्पसंख्यांकांनी हिंसा केली की, जणू त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य असल्याप्रमाणे गप्प रहायचे’, ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुरोगामी नेते यांची दुटप्पी भूमिका आहे. रझा अकादमीने काही वर्षांपूर्वी मुंबईत दंगल घडवून महिला पोलिसांवर हात टाकण्याचा गंभीर प्रकार केला होता. असे असतांनाही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी गुळमुळीत भूमिका घेतली अन् परिणामी त्या दंगेखोरांना अद्यापही कठोर शिक्षा झालेली नाही. ‘मुसलमानांचे लांगूलचालन करणे’, हाच पाया असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून हिंदूंच्या संरक्षणाची अपेक्षा नाही; मात्र हिंदुत्वाचा पाया असलेले भाजप आणि शिवसेना यांनी रोखठोक भूमिका घ्यावी, हिंदूंचे रक्षण करावे आणि हिंदूंना सुरक्षित वाटेल, अशी परिस्थिती निर्माण करावी, हीच हिंदूंची अपेक्षा !

नागपूर दंगलीतील धर्मांधांविषयी भयावह माहिती उघड होत असतांनाही त्या विषयी पुरोगामी नेत्यांनी ‘ब्र’ही न काढणे, हे मुसलमानांचे लांगूलचालनच !